आपले न्यायलय ही नरेंद्र मोदी अन् अमित शहांच्या दबावाखाली काम करतात का? अशी लोकांना शंका येऊ लागली आहे”- संजय राऊत यांची टीका

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टामधील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली नसून प्रत्येकवेळी नवी तारीख दिली जात आहे.काल पुन्हा एकदा या सुनावणीची तारीख लांबणीवर गेल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.तारीख पे तारीख.. १४ जुलैला होणारी सुनावणी १४ ऑगस्टवर गेली. यातून पक्षांतर करणाऱ्या अन् क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळते. खरं म्हणजे देशातील घटनाबाह्य सरकार रोखण्याचे काम न्यायव्यवस्था अन् संविधानाचे आहे. पण आपले न्यायलय ही नरेंद्र मोदी अन् अमित शहांच्या दबावाखाली काम करतात का? अशी लोकांना शंका येऊ लागली आहे”महाराष्ट्रामध्ये ज्याप्रकारे क्रॉस वोटिंग झालं. त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे, पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये यांच्यावर आम्ही तारखांवर तारखा घेतोय, कारवाई करत नाही. त्यामुळेच यांची भिती चेपली आहे. आम्ही एका पक्षाच्या तिकीटावर निवडून यायचं आणि कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्याला मतदान करायचं,” असा घणाघात राऊतांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button