भर रस्त्यावर वासराचं शिर सापडल्यानं खळबळ; लोक आक्रमक ,अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी शहर परिसरात राजरोसपणे गोवंशीय मांसाची वाहतूक होत असल्याच्या काही संघटनेने आधी तक्रारी केल्या असतानाच गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास रत्नागिरी टीआरपीजवळ एका टेम्पोतून लहान एका वासराची मान रस्त्यावर टेम्पोतून पडल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार समजतात मोठ्या प्रमाणावर नागरिक गोळा झाले होते. काही संघटनांचे पदाधिकारी ही घटनास्थळी आले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसदेखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाकाबंदी केली. पण टेम्पो हाती लागला नाही. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वासराचे शिर सापडल्याने शेकडोंच्या संख्येने नागरिक ग्रामीण पोलीस ठाण्याबाहेर जमले. राजरोसपणे गोमांसाची वाहतूक रत्नागिरी शहरात होत असल्याचे दिसून आल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे. तो टेम्पो पकडून तात्काळ संबंधितावर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिक तळ ठोकून होते. शेवटी आज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात अशा गुरांच्या वाहतुकीचे व गुरांना बेकायदेशीर रित्या कत्तल खान्यात पाठवताना वाहनांना पकडण्याचे प्रकार आधी उघड झाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button