
खेड तालुक्यात पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीत झाला
खेड तालुक्यात यंदा मान्सूनने वेळेत व दमदार हजेरी लावली आहे. पण पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीत झाला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.महावितरणने मान्सूनपूर्व कामांसाठी वीजपुरवठा खंडित करत देखभालीची कामे देखील पूर्ण केल्याचा दावा केला आहे. गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मात्र पहिल्याच पावसात महावितरणचा गोंधळाचा कारभार समोर आला आहे. कोणत्याही क्षणी खंडित होणार्या वीजपुरवठ्याची छोट्या व्यावसायिकांना झळ बसत आहे.www.konkantoday.com