
कोकण रेल्वे भरतीत २१ पैकी २ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना संधी, भरती रद्द करण्याची शौकत मुकादम यांची मागणी कोकण रेल्वे भरतीत कोकणावर अन्याय झाल्याने भरती रद्द करावी
चिपळूण ः कोकण रेल्वे महामंडळात स्टेशन मास्तरची भरती असताना प्रकल्पग्रस्त व माजी सैनिकांना प्राधान्य होते. या भरतीत एकूण २१ उमेदवारांपैकी कोकणातील केवळ दोन प्रकल्पग्रस्तांना संधी देण्यात आली आहे. या भरतीत कोकणातील प्रकल्पग्र्रस्तांवर अन्याय झाला असून आपण तो सहन करणार नाही. हे नवीन स्टेशनमास्तर कोकणात जेथे जेथे हजर होतील तेथून त्यांना हुसनावून लावले जाईल. या भरतीची चौकशी करून ती रद्द करावी अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.