
वृद्धाकडून बालिकेशी गैरप्रकार, पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरी लगतच राहणार्या ५ वर्षीय बालिकेशी ६७ वर्षीय वृद्धाने गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. पीडित बालिकेने घडला प्रकार आपल्या आईजवळ सांगितल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संतापलेल्या नातेवाईकांनी या प्रकरणी वृद्धाविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या वृद्धाविरूद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.अशोक गणपत भडकमकर (६७, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाख केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार २६ मार्च २०२४ रोजी आरोपी अशोकने पीडित बालिकेला जवळ बोलावून तिच्याशी गैरप्रकार केला. तसेच घडल्या प्रकाराबद्दल कुणाला काही सांगितल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकी या पीडित बालिकेला दिली. या घटनेनंतर पीडित बालिका ही घाबरून आईजवळ आली व रडू लागली. मुलीच्या अचानक रडण्याचे कारण समजून येत नसल्याने पीडितेच्या आईने काय झाले, असे विचारण्यास सुरूवात केली. आईने मुलीला शांत करून विचारणा केली असता सर्व घडला प्रकार पीडितेने कथक केला. www.konkantoday.com