
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाची 13 एप्रिल रोजी वेतोशी येथे वनभोजन सहल
रत्नागिरी (प्रतिनिधी) : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने येत्या शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथील शिवार फार्म हाऊस वर वनभोजन सहल आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता कुवारबाव ज्येष्ठ नागरिक भवन येथून सहलीसाठी प्रस्थान होईल. सकाळी ९ वाजता वेतोशी येथे आगमन झाल्यानंतर शिवार फार्म हाऊस मधील विविध प्रकल्पांना जेष्ठ नागरिक भेट देतील. त्याचवेळी या ठिकाणी गीत गायन तसेच ज्येष्ठांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होतील.दुपारनंतर वेतोशी येथील प्राचीन श्री व्यंकटेश्वर मंदिराला भेट आणि दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीकडे परतीचा प्रवास होईल. फार्म हाऊसवर सकाळी चहा नाश्ता दुपारी वनभोजन असे कार्यक्रम होतील फार्म असे मालक श्री अशोक साळुंखे यांनी ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित केले असून सहलीचे व्यवस्थापन संघाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम करीत आहेत. संघाचे अध्यक्ष श्री मारुती अंबरे यांच्या नेतृत्वाखाली 35 ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी या वनभोजन सहलीत सहभागी होणार आहेत.