वाशिष्ठीला साडी नेसविणे म्हणजे मूर्खपणाचा प्रकार -हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिश कदम

वाशिष्ठी नदीला साडी नेसविणे हा मूर्खपणाचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया हेल्प फाऊंडेशन चिपळूणचे अध्यक्ष सतिश कदम यांनी दिली आहे.वाशिष्ठीला साडी नेसवण्याची बातमी वाचण्यात आली. हा नवीनच काय प्रकार पुढे आला आहे. नदीला साडी नेसणं या मागे काही श्रद्धा किंवा धार्मिक कारण असू शकेल, परंतु त्याने नदीच्या एकूणच संवर्धनामध्ये काय फरक पडणार आहे. याचे उत्तर आयोजकांनी दिलं पाहिजे. अलिकडे जी गोष्ट आपल्या हाताबाहेर जाते तिला मग धार्मिक रूप देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. पण वाशिष्ठी नदीवर गेले चार-पाच वर्षे काम सुरू आहे. गाळ काढण्यासाठी प्रक्रिया नागरिकांच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. व काही अंशी चिपणूणला पुरापासून दिलासाही मिळालेला आहे. नदी संवर्धन करायचं असेल, तर नदीचे पात्र हे स्वच्छ प्रदूषणमुक्त असावे हा आग्रह समजू शकतो. परंतु विकासाची कोणतीही गोष्ट धार्मिक किंवा परंपरेने बांधणे अयोग्य आहे, असे मत कदम यांनी मांडले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button