
शिमगोत्सवासाठी दादर-चिपळूण स्वतंत्र स्पेशल चालवण्याची मागणी
शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ८ मार्चपासून सुरू केलेल्या दिवा-रोहा चिपळूण मेमू स्पेशलला १५ मार्चपासून अचानक ब्रेक लागल्याने चाकरमान्यांचा हिरमोडच झाला आहे. रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चाकरमान्यांसाठी दादर-चिपळूण स्वतंत्र स्पेशल चालवावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह रेल्वेच्या अधिकार्यांकडे केली आहे.शिमगोत्सवासाठी लाखांेंच्या संख्येने चाकरमानी मुंबईहून गावी येत असतात. रेल्वे प्रशासनाकडून आतापर्यंत अवघ्या १० होळी स्पेशल जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेत आणखी जादा गाड्या चालवणे आवश्यक आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ८ मार्चपासून शिमगोत्सवासाठी दिवा-रोहा-चिपळूण मेमू स्पेशल सुरू केली होती. मात्र रोहा येथील प्रवाशांना आक्रमक भूमिकेनंतर संभाव्य धोका टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सावध पवित्रा घेत मेमू स्पेशलला अचानक ब्रेक लावला. www.konkantoday.com