
अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरें*
*_सध्या ज्या प्रकारे कारवाया सुरू आहेत ते पाहता अशाप्रकारचे राजकारण भविष्यात भाजपालाही परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेले नसते. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या दुसरे सत्तेत आले तर तुम्ही काय कराल?.भारतात जे काही ईडी, सीबीआय सुरू आहे. मग इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी केले. परंतु त्यांनी केले म्हणून तुम्ही करायचे हे असं होत नसते असं सूतोवाच राज ठाकरे यांनी भाजपाबाबत केले आहेत. नाशिकच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, मतदारांनी याबाबतीत निर्णय घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार वठणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही. दहा चुकीच्या गोष्टीपासून दुर्लक्ष करायचे आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवर मतदान करायचे. त्यामुळे समोरचा पुन्हा दहा चुकीच्या गोष्टी करायला मोकळा होतो असं त्यांनी सांगितले. तसेच ईव्हीएमबाबतीत मी जेव्हा बोलत होतो तेव्हा कुणी मला साथ दिली नाही. आता तेच बोंबलतायेत, बोंबला असा टोलाही राज ठाकरेंनी विरोधकांना लगावला. www.konkantoday.com




