विद्यार्थ्यांसाठी एसटी थांब्यावर बस न थांबविल्यास थेट ’कारवाई’ होणार


मिरजोळी, फरशी परिसरातील एस.टी. थांब्यावर बस थांबविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना दोन-तीन तास मागाहून येणार्‍या एसटी बसची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. वारंवार घडणार्‍या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शिवाय याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत घेत आगार प्रशासनाने एस.टी. थांब्यावर बस न थांबविल्यास थेट कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना चालक-वाहकांना देण्यात आल्या आहेत.
शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत या एसटी थांब्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांचा त्रास नको म्हणून अनेकदा एसटी चालक विद्यार्थ्यांना टाळून बस पुढे नेत असतात. याशिवाय बसमध्ये विद्यार्थी व्यवस्थित चढले आहेत का किंवा उतरले आहेत का याची खात्री न करता बस घाईगडबडीत सुरू करत असल्याने या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा एसटी प्रवास सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता या विषयी विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांनी तक्रारी सुरु केल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button