
कोकण रेल्वेत वडापाव खाताय, मग त्याच्या आधी हे पहा*
*____वडापाव म्हणजे सर्वांचे आवडते खाद्य रेल्वेच्या प्रवासात आपण वडापावला प्राधान्य देतो परंतु आता एका फोटोमुळे तुम्ही रेल्वेत यापुढे वडापाव खाणारच नाही. चिपळूण रेल्वे स्थानकातील एक वडापाव विक्रेता तर केलेल्या वडापावावरच पाय ठेवून ताणून झोपला असल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. याबाबतचा एक फोटो कोकणी कार्टी ग्रुपचे सदस्य अनिल कुबडे यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला असून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.कोकण रेल्वेतून मोठ्या संख्येने आपले कोकणवासीय प्रवास करतात. या प्रवासात त्यांच्या आवडीचा वडापाव ते हमखास खातात मात्र हे वडापाव बनविणारे जास्तीत जास्त परप्रांतीय आहेत. असाच चिपळूण रेल्वे स्थानकात एक परप्रांतीय वडापाव विक्रेता प्रवाशांकरिता बसण्यासाठी असलेल्या आसनावर वडपाव ट्रे ठेवून त्या वडापावाच्या ट्रेवरच चक्क पाय ठेवून झोपलेल्या स्थितीत आढळून आला आहे. www.konkantoday.com