
चिपळुणात ट्रक-दुचाकी अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर पॉवरहाऊस येथे ट्रक व दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडला. या प्र्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाबुद्दीन दीन मोहम्मद (हरियाणा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संदेश यशवंत तामुंडकर (५०) हे आपल्या दुचाकीवरून गुहागर बायपास मार्गाकडे जाण्यासाठी पॉवरहाऊस येथे रस्ता बदलत असताना सावर्डेकडून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने ते जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com