मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू


मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली.भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.

गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे तर 14 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button