
विनयभंग प्रकरणी सरकारी कर्मचार्यास शिक्षा
अल्पवयीन युवतीच्या विनयभंग प्रकरणी आसिफ अल्लाउद्दीन तडवी (सध्या रा. शिवतर रोड, संत सेनानगर, खेड, मुळगाव रा. सावखेडा-जळगांव) या सरकारी कर्मचार्यास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी मंगळवारी ६ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना १९ मे २०२३ मध्ये घडली होती. हा शिक्षा झालेला कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी असल्याचे समजते.
पीडीत अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी बालकांचे संरक्षण अधिनियम व नियम २०१२ चे कलम ७, ८, ९, १० प्रमाणे येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी झाली असता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एन. बी. धोगडे व जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता मृणाल जाडकर यांनी युक्तीवाद केला. www.konkantoday.com