रत्नागिरीत गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगणार्‍यावर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील खालची आळी येथील नारळाच्या बागेत गोवा बनावटीची 4 हजार 560 रुपयांची दारू बाळगणार्‍या तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वा. करण्यात आली. मौला कासम शेख (वय 34, रा. मिरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.त्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रवीण खांबे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, खालची आळी येथील आईस फॅक्टरीच्या मागे असलेल्या नारळाच्या बागेत मौला शेख बेकायदेशीरपणे दारू विक्री करत होता. याचा अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button