नेवरे येथून आईचे मंगळसूत्र घेऊन तरूण बेपत्ता

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथून तरूण बेपत्‍ता झाल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दिलीप दीपक घाणेकर (वय 32, रा. नेवरे मुरुगवाडी, रत्नागिरी) असे बेपत्‍ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.दिलीप सोमवार 18 जुलै 2022 रोजी घरात कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याने अंगात लाल रंगाचे टी – शर्ट परिधान केलेले आहे. टीशर्टवर पाठीमागे शिमगोत्सव, सौजन्य मिरकर कुटुंब मुरुगवाडी असे लिहिलेले असून नेसणीस निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. सोबत आईचे घरातील 3 तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन गेला आहे. दिलीपबाबत काही माहिती मिळून आल्यास नागरिकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन घाणेकर कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button