संगमेश्वर रेल्वे स्थानकामध्ये दुरवस्था प्रवासाच्या जीवावर बेतेल


संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असणाऱ्या संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकात गैरसोई असल्याचे वारंवार सांगण्यात येते. त्यात आता या स्थानकावर उभारण्यात आलेली शेड अतिशय वाईट अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शेडचे बांधकाम व्यवस्थित करण्याची मागणी जोर धरत आहे
या रेल्वे स्थानकातून कोकण रेल्वेला करोडो रुपयांचे उत्पन्न प्रवाशांमार्फत मिळते. असे असले तरी या स्थानकाबद्दल कोकण रेल्वेकडे कोणत्याही सुविधांबाबत मागणी केली असता कोणते ना कोणते कारण सांगून वेळ काढूपणा केला जातो. एखाद्या प्रवाशाने तिकीट काढले, तर त्याला इतर गोष्टींची सुविधा मिळाली पाहिजे.
पण संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकामध्ये एखादा प्रवासी मुंबईहून अथवा गावातून प्रवास करीत असताना स्थानकात प्रवाशांच्या सावलीसाठी बसविलेल्या शेड कोसळण्याच्या अवस्थेत असून कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
तेव्हा अशी कोणतीही गंभीर दुर्घटना झाली तर त्यास जबाबदार कोण? असा ज्वलंत प्रश्न निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक समूहाचे प्रमुख व पत्रकार संदेश जिमन यांनी को रे प्रशासनास विचारला आहे.
संगमेश्वर रोड क्रमांक १ वरील स्थानकातील प्रवाशांच्या सावलीसाठी तयार केलेल्या बैठकीच्या शेडवरील कौले कोणत्याही क्षणी बसलेल्या प्रवाशांच्या डोक्यात पडून गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ही दुर्घटना टाळण्यासाठी लवकरात लवकर तुटलेली कौले तात्काळ बदली करून होणार्‍या दुर्घटनेपासून प्रवाशांचा जीव वाचण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांची आरोग्यविषयक सोयी सुविधांपासून होत असलेली गैरसोय दूर करावी.
तेव्हा या संदर्भात लवकरात लवकर दुरुस्ती करावी व्हावी. दुरुस्ती न झाल्यास याला कोकण रेल्वे प्रशासन जबाबदार धरले जाईल, असा इशारा संदेश जिमन यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button