दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत वाळू उपशावर छापा

दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत अडखळ येथे महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी अनधिकृत वाळूचा उपसा करणार्‍या प्लॉटवर कारवाई करून १५ ब्रास वाळू जप्त केली आहे. महसूल विभागाच्या पथकाने दि. १७ रोजी सकाळी अडखळ येथे छापा टाकला असता एका प्लॉटवर १५ ब्रास वाळूचा साठा आढळून आला. तो जप्त करण्यात आला. खाडीत २ सक्शन पंप असलेल्या बोटीही या पथकाला आढळून आल्या. हे दोन्ही सक्शन पंप तोडण्यात आले असून २० ब्रास वाळू असलेल्या दोन बोटीही खाडीतील पाण्यात बुडविण्यात आल्या आहेत. या कारवाईत निवासी नायब तहसीलदार शिराळकर, मंडळ निरीक्षक सुदर्शन खानविलकर, तलाठी अमित शिगवण, मिरासे हे सहभागी झाले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button