सिंधुदुर्गात बैलांची झुंज सुरू असताना बैलाचा मृत्यू

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयापासून जवळच बैलांच्या ‘कोकण किंग’ या झुंज स्पर्धेदरम्यान वेंगुर्ले तालुक्यातील ‘बाबू’ नावाच्या देखण्या बैलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर या स्पर्धेत कुडाळचा अर्जून नावाचा बैल विजयी ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दीत झालेल्या स्पर्धेत पोलीस प्रशासनाचा नजरेआड कशी राहिली? असा सवाल व्यक्त होत आहे. या स्पर्धेमध्ये नावाजलेल्या “बाबू” या बैलाच्या झालेला मृत्यूला जबाबदार कोण? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. व्हिडिओमध्ये रक्तबंबाळ स्थितीत “बाबू” नावाच्या बैलाची अवस्था पाहून अनेकांनी ही झुंज सोडवण्याऐवजी या स्थितीत देखील बाबू आणि अर्जुनमधील झुंज वाढण्यासाठी हुल्लडबाजी केली. ती पाहता या सर्वांवर कारवाई होणार का? या मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या सर्वांना कोणी दिला? पोलीस अधीक्षक या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देतील का? असा सवाल आता प्राणिमित्रातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, 28 मार्च दरम्यान झालेल्या या सर्व गैर प्रकाराबद्दल पोलीस अधीक्षक लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करतील का? असा सवाल आता प्राणीप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button