पुरवठा विभागाचे अधिकारी रेशन दुकानदारांना छळतात रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे व्यथा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष अशोकराव कदम, सचिव नितीन कांबळे, प्रशांत पाटील, शशिकांत दळवी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रेशनिंगसंदर्भातील वस्तुस्थिती जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडली व त्यांना निवेदन देण्यात आले. अधिकार्‍यांकडून तपासणीच्या नावाखाली छळ होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आश्वासन यावेळभ जिल्हाधिकार्‍यांनी दिले. पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने,या महिन्याच्या अखेरीस ती पुरवठा कार्यालयात जमा केली जाणार असल्याचेही संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. यापूर्वीही त्रास देणार्‍या अधिकार्‍यांबाबत तक्रार करण्यात आली होती. अशी माहिती संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांना दिली.तक्रारीची प्रत आपल्याला द्यावी, त्यावर आपण कारवाई करु, त्याचप्रमाणे मागील तक्रार अर्जावर काय निर्णय झाला याचीही चौकशी करु असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button