मंडणगड नगर पंचायत निवडणूक : 4 प्रभागांकरिता 9 उमेदवार रिंगणात, शेवटच्या दिवशी दोघांची माघार

मंडणगड : नगरपंचायतीच्या ओबीसी आरक्षणामुळे डिसेंबर महिन्यात रद्द झालेल्या चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया 28 डिसेंबर 2021 रोजी नव्याने सुरु झाली असून 10 जानेवारी 2022 रोजी निवडणूक उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
4 प्रभागाकरिता 11 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. यातील 2 जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता 4 जांगासाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात प्रभाग क्रमांक 3- केशवशेठ लेंडे नगर येथून प्रियांका लेंडे विरुध्द नम्रता पिंपळे अशी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 7 – सापटेवाडी येथे संजय सापटे, निलेश सापटे, महेंद्र सापटे अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 6 – दुर्गवाडी 2 येथून सुभाष सापटे विरुध्द नरेश बैकर अशी दुरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग क्रमांक 9 – भेकतवाडी येथून अश्विनी गोरीवले विरुध्द प्रमिला किंजळे अशी दुरंगी लढत होणार आहे. या 4 प्रभांगाकरिता 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. 19 जानेवारी 2022 रोजी डिसेंबर महिन्यात झालेल्या 13 व जानेवारी महिन्यातील 4 अशा एकूण 17 प्रभागांचा निकाल जाहीर होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button