
बुधवारी राज्यात 14 लाख 39 हजार 809 नागरिकांना लस देण्यात आली
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज, बुधवारी (दि.8सप्टेंबर) रोजी रात्री आठ वाजेपर्यंत 14 लाख 39 हजार 809 नागरिकांना लस देण्यात आली आहे.राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 55 लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.
www.konkantoday.com




