
कोरोना पेशंट होतो मी सुद्धा,पण आपण आहात कोरोना योद्धा- रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी
सन्मान देवदूतांचा’ हा विशेष कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला.
या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे रामदास आठवलेंनी जोरदार टोलेबाजी केली.आठवलेंच्या कवितेने उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे.
कोरोना पेशंट होतो मी सुद्धा,
पण आपण आहात कोरोना योद्धा…
वंदन करतो शिवाजी महाराज, आंबेडकर आणि गौतम बुद्धा….
कारण माझ्या मनात आहे तुमच्याबद्दल श्रद्धा…
जसं घरघर चालत असतं जातं,
तसंच असतं माणुसकीचं नातं…
जसं बँकेत असतं आपलं खातं…
तसं नसतं माणुसकीचं नातं…
कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले
पण डॉक्टरांनी लाखो रुग्णांना वाचवले…
अनेक पेशंटला मी हॉस्पिटल मध्ये पाठवले
तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलचे दिवस मला आठवले…
आणि मी आहे रामदास आठवले…
मी दिला होता गो कोरोना गो चा नारा,
कोरोनाला गो म्हणता म्हणता कोरोना माझ्या पाठी लागला
www.konkantoday.com




