
एल अँड टी कंपनीची विद्युत तार चोरणार्या आरोपींना पोलीस कोठडी
एल अँड टी कंपनी मार्फत सुरू असलेल्या कोकण रेल्वे विद्युतीकरण कामासाठी वापरली जाणारी सुमारे ९ लाख रुपये किमतीची विद्युत तार कुडाळ येथील रेल्वेच्या गोदामात असलेली या गोदामाचा सुपरवायझर सुनिलकुमार दास यांने चोरल्याची घटना घडली असून याप्रकरणी रत्नागिरी येथील भंगारवाला फुरकखान मलिक (वय २०, रा. उत्तर प्रदेश) तसेच रत्नागिरी एल अँड टी कंपनीचा सुपरवायझर सुर्यकांत पानी (वय २७, रा. ओडीसा) आणि कुडाळ गोदामाचा सुपरवायझर सुनिल कुमार दास (वय २१, रा. ओडीसा) यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या तिघांनाही कुडाळ न्यायालयात हजर केले असता ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
www.konkantoday.com