आंबा घाटात गायमुख जवळ खोल दरीत ट्रक कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू

आंबा घाट प्रारंभी असणाऱ्या गायमुख ठिकाणी खोल दरीत ट्रक कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील एका अवघड वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक चारशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात एकाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चनप्पा बीजाभाय असे दरीत कोसळुन मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. तर क्लिनर जखमी झाला आहे. एपी 21 पीझेड 5227 हा बाराचाकी ट्रक आंध्रप्रदेश मधून रत्नागिरीत येत होता. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर गायमुखाच्या वरील अवघड वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button