ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात , याबाबची आणखी माहितीही समोर येईल -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया दिली. ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात असून, याबाबची आणखी माहितीही समोर येईल असं लक्षवेधी वक्तव्य त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं.सचिन वाझेंचं प्रकरण गंभीर असल्यामुळं हाताशी असलेल्या पुराव्यांच्या बळावर मी ते सभागृहात मांडलं. पण, पोलीसच असे वागू लागले तर मात्र परिस्थिती अवघड आहे. पोलिसांची अशीच वागणूक राहिल्यास राज्याच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सचिन वाझे प्रकरणावर भाजपची भूमिका पाहता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर नाराजीचा सूर आळवला होता. त्यावरच प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘इतके पुरावे सादर केल्यानंतर मुंबई पोलिसांवर अविश्वास, महाराष्ट्रद्रोह असं सारं बोलणाऱ्यांनी एकदा तरी आरशात पहावं.’ या सर्व घटनांनी मुंबई पोलिसांची प्रतिमा आहे तशी राहते की ती आणखी मलीन होते, याकडे लक्ष दिलं जाणं तितकंच गरजेचं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारचे कान टोचले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button