
माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री सुरेशजी प्रभू यांच्याशी जिल्ह्यातील समस्यांबाबत जिल्हा हॅाटेल असोसिएशनच्या सदस्यांनी चर्चा केली,अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री सुरेशजी प्रभू यांनी मंगळवार दि. ५.१.२०२१ रोजी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात रत्नागिरी जिल्हा हॅाटेल असोसिएशनला चर्चेसाठी वेळ दिला.
आपल्या संघटनेने अगोदरच अध्यक्ष श्री किर साहेब यांचा मार्गदर्शना खाली त्यांचेकडे वरिलप्रमाणे मागण्याच निवेदन पाठवल् होत्, त्या व इतर विविध प्रश्नावर त्यानी खालील प्रमाणे उत्तरे दिली.
१. रेल्वे: येथिल स्थानिक अधिकारी श्री शेंडे यांना समक्ष सूचना देउन आपल्या संघटनेशी सविस्तर चर्चा करुन काय करता येईल ते पहायला सांगितले.
२. हायवे:
मुंबई गोवा चे रखडलेले काम (आरवली ते वाकेड) या संदर्भात नॅशनल हायवेचे अधिकारी यांना वस्तुस्थिती काय आहे याची माहीती देण्याची सूचना दिली. तसेच डिसेंबर २०२२ पर्यंत हा टप्पा पूर्ण करणार असल्याचे केंद्रीय वाहतुक खात्याचे पत्र देखिल ताब्यात दिले.
३. सागरी किनारी महामार्ग:
केंद्र शासना कडुन हा महामार्ग राज्य सरकारला हस्तांतरीत झाल्याने त्याचे भवितव्य राज्यसरकारचे हाती असल्याचे सांगितले.
४. सर्व्हे:
सध्या कोकणात झालेल्या कातळ शिल्प संशोधनावर खूपच समाधान व्यक्त केले. हे काम करणाऱ्या श्री भाई रिसबुड, धनंजय मराठे व सहकाऱ्यांचे खूप कौतुक केले. सध्या केलेल्या संशोधनाचे इंग्रजी भाषेत रुपांतर करुन माहीती त्यांचे कार्यालयाला पाठवायला सांगितली. सदर माहीतीला प्रसिद्धी देण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासित केले.
५. गाईड प्रशिक्षण
मा. सौ. उमा प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्थे मार्फत परिवर्तन केंद्र या उपक्रमांची माहीती दिली. CII या संस्थेशी संलग्नतेने सध्या परिवर्तन केंद्रामार्फत विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते. वरिल या दोन संस्था व राधा यांचा सामंजस्य करार करुन पर्यटन व्यवसायाशी निगडीत विवीध प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे कबुल केले.
६. उद्योग दर्जा:
या प्रश्नावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु असुन सदर मागणी रास्त असल्याने त्याबाबत सहमती दर्शवली व संधी मिळेल तिथे त्यासाठी पाठिंबा देण्याचे कबुल केले.
७. वॅाटर स्पोर्ट्स:
याबाबतीत येत असलेल्या अडचणींचे वेगळे पत्र देण्याचे आवाहन त्यानी केले. तसेच त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन असे सांगितले.
राधा चे सदस्य एकत्र येऊन रत्नागिरी हे डेस्टिनेशन व्हावं म्हणून करत असलेल्या प्रयत्नांच ही प्रभू साहेबांनी खूप कौतुक केलं*,यानंतर आभार प्रदर्शन होउन पुढील कार्यक्रमाला ते रवाना झाले.
त्यांचे सोबत ॲड दीपक पटवर्धन व माजी आमदार विनय नातू यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
राधा तर्फे पुढील सभासद उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री उदय लोध,खजिनदार श्री दादा वणजू ,श्री कौस्तुभ सावंत, श्री सुहास ठाकुरदेसाई, श्री महेश सावंत, श्री राकेश भोसले, श्री सचिन देसाई, सौ ममता नलावडे, इ.
हॅाटेल सी फॅन्स ने कार्यक्रमाचे व भोजनाचे आयोजन केले होते.
www.konkantoday.com
