
चिपळूण तालुक्यात फोटो काढण्याच्या बहाण्याने ७२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने परत न केल्याने फसवणूक
फोटो काढण्याच्या बहाण्याने बहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे घेतलेले दागिने परत न केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार सावर्डे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे .फसवणूकीची ही घटना शुक्रवार १८ डिसेंबर रोजी सकाळी घडली.
दर्शना दशरथ जड्याळ (रा. चिपळूण, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात श्वेता चंद्रशेखर घाणेकर (36, रा.चिपळूण, रत्नागिरी) यांनी सावर्डे पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,१८डिसेंबर रोजी दर्शनाने बँकेत खाते काढण्यासाठी फोटो काढायचे आहेत. असे कारण सांगून श्वेताकडून तिचे सोन्याचे सुमारे ७२ हजार ५०९ रुपयांचे दागिने मागून घेतले होते.ते तिने परत केले नाहीत
www.konkantoday.com