
अवैध गुटखा विक्री सूत्रधार यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई?
गुटखा कंपन्यांचे मालक तसेच अवैध गुटखा विक्री व्यवसायाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी याबाबतचे सूतोवाच केले. ज्या क्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होत असल्याचे आढळेल तेथील अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
www.konkantoday.com