वालोपे खूनप्रकरणी आरोपी पवन आंबेडेला न्यायालयीन कोठडी

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वालोपे येथे नवनाथ बबन कांबळे (वय ३३) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी पवन जयंत आंबेडे याला शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

वालोपे-देऊळवाडी येथील झोलाई जनरल स्टोअर्सच्या मागील बाजूस १७ नोव्हेंबर रोजी सकाळी नवनाथ कांबळे यांचा मृतदेह आढळून आला होता. जांभ्या दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तपास करून पवन जयंत आंबेडे याला अटक केली होती.

अटकेनंतर आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी जिल्हा विशेष कारागृहात करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button