कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रामध्ये सहभागी होण्याचे प्रसाद देवस्थळी यांचे आवाहन

३ जानेवारी २०२७ रोजी रत्नागिरी येथे चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यती होणार आहेत.
तसेच २८ मार्च २०२७ रोजी गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये २८ किमी, ४२ किमी आणि ५६ किमी अशा अंतरांची आव्हाने धावपटूंसाठी उपलब्ध असणार आहेत.
कोकणचा निसर्ग, समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य रस्त्यांवर धावण्याचा अनुभव घेण्यासाठी तसेच स्वतःच्या फिटनेसला नवे आव्हान देण्यासाठी जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रसाद देवस्थळी आणि अंकिता प्रभू-पाटकर यांच्या या कामगिरीचे रत्नागिरीतील क्रीडा, फिटनेस आणि सामाजिक क्षेत्रातून कौतुक होत असून, दोघांचेही सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

प्रसाद देवस्थळी यांनी कोकणातील तसेच राज्यभरातील धावपटूंना आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button