रोहित पवार यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये. एका शब्दाने वाद पेटला


पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुण्याला कठोर पालकमंत्री देण्याची मागणी त्यांनी केली.

तर सुनेत्री वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही असे मोठे विधान रोहित पवार यांनी केले. त्यावरून राजकीय वाद पेटला. त्यानंतर पवारांनी व्यक्तिगत माफीही मागितली. पण एका शब्दाने वाढलेला वाद वाढला. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीतूनही त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.मावळचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिणींना दादांसारखे काम करता येत नाही या रोहीत पवार यांच्या विधानावर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक झाले. मुख्यमंत्री यांनी पुण्याचे पालकमंत्री पद घेतले तर पुण्याचे वाटोळे होईल, असे रोहित पवारांनी मत व्यक्त मांडले होते. दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही पण जर कडक पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा काकींना ताकद द्या. रोहित पवार यांनी केलेल्या विधानांवर आमदार सुनील शेळके यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. जर ते स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींवरच असे बोलत असतील, तर त्यांना आता एखाद्या ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये’ दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोला सुनील शेळके यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button