शाहनवाज शाह यांची कोकण विभाग जलयोद्धा म्हणून नियुक्ती

जलसंपदा विभाग आणि यशदाकडून कार्याची दखल; २५ वर्षांच्या जलसंवर्धन आणि पर्यावरणविषयक योगदानाचा गौरव

रत्नागिरी : पाणी संवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेले स्थापत्य अभियंता व जलअभ्यासक शाहनवाज शाह यांची महाराष्ट्र शासनाकडून कोकण विभाग जलयोद्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी यशदा, पुणे यांच्या माध्यमातून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जलसाक्षरता अभियान, वाशिष्ठी व जगबुडी नदी संवर्धन, नदीतील गाळ उपसा, वृक्षलागवड, देवराई निर्मिती आणि वनवणवा प्रतिबंध अशा विविध उपक्रमांत त्यांनी योगदान दिले आहे. २०२१ च्या महापुरानंतर चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातूनही त्यांनी तांत्रिक बाजू मांडली होती.

त्यांच्या जलसंवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल घेत नदी की पाठशाला फाउंडेशनने त्यांना ‘नदी सेवक’ किताबाने गौरविले आहे. आता शासनाने कोकण विभाग जलयोद्धा म्हणून नियुक्ती केल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button