पालघर-सिन्नर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात; २४ प्रवासी सुखरूप

पालघरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या शिवशाही बसला रविवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पालघर-सिन्नर महामार्गावरील वाघोबा घाटात अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे.

ब्रेकमध्ये बिघाड झाल्यानंतर बस रस्त्यालगत असलेल्या सुरक्षा कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातामुळे बसचे नुकसान झाले; मात्र सुदैवाने बसमधील सर्व २४ प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रेकमध्ये बिघाड नेमका कशामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button