ॲॅग्री वेल्फेअर पोर्टल‌’,शेतकऱ्याच्या मोबाईलवर आता सगळ्या योजना


शेतकऱ्यांना आता शासकीय योजना, आर्थिक मदत आणि शेतीविषयक माहितीसाठी सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. केंद्रीय कृषी विभागाने ‌’ॲॅग्री वेल्फेअर पोर्टल‌’ लाँच केले आहे.

या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या कृषी योजना, खते-बियाणे, अनुदान आणि इतर डिजिटल सेवांची माहिती मिळणे सोपे होणार आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा लाभ घेता येणार असून कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग शेतकऱ्यांसाठी खुला झाला आहे. या पोर्टलवर शेतीविषयक अनेक महत्त्वपूर्ण सेवा आणि सुविधा एकाच क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजना, पीक विमा, विविध कृषी अनुदानाची माहिती समाविष्ट आहे. रत्नागिरीतील आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.शेतकऱ्यांना समजावी यासाठी पोर्टलवर साध्या भाषेत माहिती देण्यात आली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर करता यावा यासाठी तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

पोर्टलचा वापर कसा करायचा?

आपल्या मोबाईल किंवा संगणकाच्या ब्राऊझरमध्ये agriwelfare.gov.in हे संकेतस्थळ उघडावे. लॉगिन करण्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल नंबर ओटीपीसाठी जवळ ठेवावा. त्यानंतर हवी ती योजना, अनुदान, पीक विम्याची माहिती एका क्लिकवर मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button