मुंबई व उपनगरात रॉकेट व आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी!

: मुंबई व ठाण्यात रविवारी अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर व उपनगरात रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध घातले आहेत.

सार्वजनिक ठिकाणे, निवासी इमारती, झोपडपट्ट्या, चाळी, मोकळ्या जागा आणि वाहनांच्या परिसरात 9 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2026 रात्री 11:59 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. तसेच या बंदीचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिस, महापालिका आणि अग्निशमन दलाला अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button