नावडीत ‘GLOWING SPORT’चा शानदार शुभारंभ; रणजित पवार, जयेश पोटफोडे यांची सदिच्छा भेट


संगमेश्वर ):
खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि दर्जेदार साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी नावडी (ता. संगमेश्वर) येथे ‘GLOWING SPORT’ या नव्या क्रीडा दालनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त महाराष्ट्र टेनिस क्रिकेट क्षेत्रातील खेळाडू, राज्य आदर्श युवक पुरस्कार व कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित रणजित पवार यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध समालोचक जयेश पोटफोडे उपस्थित होते. दोघांनीही दालनाची पाहणी करत संचालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण व स्थानिक भागातील खेळाडू क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत; त्यांना योग्य व दर्जेदार साहित्याची नेहमीच गरज भासते. ‘GLOWING SPORT’ च्या माध्यमातून ही उणीव भरून निघेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या सोहळ्यास परिसरातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्ता व संपर्क:
हे दालन नावडी (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे सुरू झाले असून सर्व दिवस सकाळी ९:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले राहील. क्रीडा साहित्याच्या चौकशीसाठी [९८९०८६७६४३] या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व क्रीडा संघ, आयोजक व खेळाडूंचे दालनात मनःपूर्वक स्वागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button