दिवाळीच्या आनंदातही कुटुंबाच्या वेदनेची जाणीव… उबाळे कुटुंबियांना सांत्वनाची साथ!

नांदेड तालुक्यातील गाडेगाव येथील शेतकरी श्री. इरबाजी उबाळे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली होती. आज शिवसेना उपनेते तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले.

दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि कुटुंबासोबत सुखाचे क्षण साजरे करण्याचा सण ! दिवाळीचा खरा अर्थ केवळ आपल्या घरात दिवे लावणं नाही, तर दुःखाच्या अंधारात असलेल्या एखाद्या कुटुंबाला माणुसकीचा आधार देणंही आहे. मात्र, ज्या घरानं आपला माणूस कायमचा गमावला आहे, त्या घरात यंदाची दिवाळी किती वेदनादायी असेल, याची कल्पनाही करवत नाही. उबाळे कुटुंबीयांच्या डोळ्यांतील दुःख आणि मनातील वेदना पाहून मन हेलावून गेलं. त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढणं शक्य नाही; मात्र या कठीण काळात त्यांना एकटं पडू न देणं, हीच माणुसकीची खरी जबाबदारी आहे, अशा भावना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केल्या.

अशा कठीण प्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांच्या सोबत बसून दिवाळीचा फराळ केला. त्यांच्या भावना समजून घेत, त्यांच्याशी आपुलकीनं संवाद साधला आणि या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो, तेव्हा केवळ सांत्वनाचे शब्द पुरेसे नसतात. त्या कुटुंबाच्या वेदना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेणं आणि संकटाच्या काळात त्यांना एकटं पडू न देणं, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. या दुःखातून सावरण्याचं बळ उबाळे कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आश्वस्थ केले.

यावेळी दिवंगत इरबाजी उबाळे यांचे लहान बंधू श्री. माधव उबाळे आणि आमदार श्री. बालाजी कल्याणकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button