
आता सावंतवाडीतही मिळणार आयुर्वैदिक उपचारांची सुविधा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांची सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या विस्तारित आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभागाचं आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. निलेश राणे, श्री. संजू परब, डॉ. दत्तप्रसाद पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


या नवीन सुविधेमुळे सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि नियमित बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेता येणार आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधांसोबतच आपल्या पारंपरिक आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचाही नागरिकांना लाभ मिळावा, हीच या उपक्रमामागील भावना आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.



