दापोली नगरपंचायतीच्या नवीन चिकन मटण इमारतीत दुर्गंधीचे साम्राज्य


दापोलीः- दापोलीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या चिकन व मटण सेंटरमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांना चिकन आणि मटण खरेदी करायला जाताना नाकावर रूमाल ठेवूनच जावे लागत आहे. यामुळे या नवीन इमारतीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दापोली नगरपंचायतीने मच्छी मार्केट लगत चिकन मटण सेंटर मच्छी मार्केट व भाजीपाला मार्केट करिता नवीन इमारत उभारली. शिवाय दापोली मुंबई रस्त्यालगत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या चिकन व मटण सेंटरवर जेसीबीव्दारे धडक कारवाई करून सर्व चिकन व मटण सेंटरवर जेसीबीव्दारे धडक कारवाई करून सर्व चिकन व मटण व्यावसायिकांना या इमारतीत स्थलांतरित केले. यामुळे दापोली नगरपंचायतीचा गाजावाजा झाला. मात्र सध्या येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. चिकन व मटण सेंटरची योग्य साफसफाई होत नसल्याने येथे दुर्गंधी पसरलेली आहे. या कमालीच्या दुर्गंधीमुळे नागरिक नाकावर रूमाल बांधून या चिकन मटण सेंटर मध्ये चिकन विकत घ्यायला जात आहे. यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button