जालगांव येथे गळफास घेऊन आत्महत्या


दापोलीः- जालगांव चोरगेवाडी येथे एका 48 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना 1 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली.
सचिन तुकाराम शिंदे (वय 48, रा. जालगांव चोरगेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सचिन शिंदे हे कोणताही कामधंदा करत नव्हते. तसेच त्यांना दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी ते पत्नीकडे वारंवार पैसे मागत असल्याने पती पत्नीमध्ये यावरून किरकोळ वाद होत असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास सचिन शिंदे यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शेजारील नागरिकांना बोलावून घेतले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी दापोली उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जालगांव चोरगेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button