अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू


मुंबई-गाेवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा – जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने बिबट्याला जाेरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
रात्रीच्या अंधारात भक्ष्याच्या शाेधात किंवा अधिवास बदलण्यासाठी बिबट्या जंगल
परिसरातून महामार्गावर आला असावा. याचवेळी महामार्गावरून जाणाèया अज्ञात वाहनाची त्याला जाेरदार धडक बसली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सकाळी महामार्गावरून प्रवास करणाèया वाहनचालकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट हाेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button