रत्नागिरीच्या अस्सल चवीला नवी ओळख

रत्नागिरीतील मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस परिवाराच्या ‘हर्षी टेरेस गार्डन रेस्टॉरंट’चं नवीन जागेत स्थलांतर तसंच ‘कोकमकरी – चव रत्नागिरीची…!’ या नव्या दालनाचा शुभारंभ आज केशवनगर, जे. के. फाईल्स, रत्नागिरी इथं राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

कोकणची खाद्यसंस्कृती, पारंपरिक चव आणि आदरातिथ्याची समृद्ध परंपरा ही आपल्या रत्नागिरीची खास ओळख आहे. या खाद्यपरंपरेला आधुनिकतेची जोड देत ग्राहकांना उत्तम सेवा आणि दर्जेदार खाद्यअनुभव देण्याचा मैत्री ग्रुप ऑफ बिझनेसचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

अशा स्थानिक व्यावसायिक उपक्रमांमुळं रत्नागिरीतील पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यास मदत होईल. जिल्ह्यातील उद्योजकांनी नवनवीन संधींचा लाभ घेत व्यवसायाचा विस्तार करावा आणि रत्नागिरीच्या आर्थिक विकासात योगदान द्यावं, अशी अपेक्षा यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.

यावेळी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रमेश किर, कौमुदी बिल्डर्सचे संचालक श्री. संतोष तावडे, वेलणकर्स केटरर्स अँड इव्हेंट्सचे संचालक श्री. संजीव वेलणकर, मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस परिवाराचे श्री. कौस्तुभ सावंत आणि श्री. सुहास ठाकुरदेसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या नव्या व्यावसायिक वाटचालीसाठी मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस परिवाराचं मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button