संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ५० जणांची जम्बो कार्यकारिणी

आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास; नवमतदार युवकांचा संघटनेत प्रवेश

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळाले असून, ५० नवमतदार युवकांनी संघटनेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या युवकांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्धार केला. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतिक साळवी यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा करून सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली.

तालुक्यातील युवकांना संघटित करून त्यांना राजकीय आणि सामाजिक कामाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. युवकांनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता समाजातील प्रश्न, स्थानिक विकास आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून युवक संघटनेत सहभागी होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे आणि मतदारसंघातील विकासकामांना गती देणे, या भूमिकेमुळे युवकांचा त्यांच्याकडे ओढा वाढत असल्याचा दावा करण्यात आला.

बेरोजगारी, शिक्षण, रोजगार आणि स्थानिक विकासाचे प्रश्न आज युवकांसमोर आहेत. या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता संघटनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम करण्याची भूमिका नव्या कार्यकारिणीतील सदस्यांनी मांडली. युवकांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, ५० नवमतदार युवकांचा संघटनेतील सहभाग हा राष्ट्रवादी युवक काँग्रेससाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी काळात तालुक्यात युवकांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button