प्रामाणिकपणामुळे हरवलेले मंगळसूत्र मिळाले परत; वर्षा पडये यांचे कौतुक

लांजा : लांजाच्या आठवडा बाजारात सापडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या वर्षा वसंत पडये यांच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला आपले हरवलेले मंगळसूत्र पुन्हा मिळाले आहे.

मंगळवारी ओजस मेडिकलसमोर वर्षा पडये (रा. कुर्णे, पडयेवाडी) यांना मंगळसूत्र सापडले. त्यांनी परिसरात चौकशी केली; मात्र मालकाचा शोध न लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. लांजा पोलिसांनी मंगळसूत्र ताब्यात घेऊन त्याबाबत माहिती प्रसारित केली. त्यानंतर कोचरी गुरववाडी येथील रोहिणी रवींद्र गुरव यांनी मंगळसूत्राची ओळख पटवली. शनिवारी पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले आणि महिला हेड कॉन्स्टेबल रेहाना नावळेकर यांनी मंगळसूत्र रोहिणी गुरव यांच्याकडे सुपूर्द केले.

हरवलेले सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याने रोहिणी गुरव यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. वर्षा पडये यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button