
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा धक्का ,अवघी 19 मध्ये मिळाली
आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे आणि हटके प्रचारशैलीमुळे कायम चर्चेत राहणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. ‘मैं खडा तो सरकारसे बडा’ अशी घोषणा देत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बिचुकले यांना अवघी 19 मध्ये मिळाली आहेत.अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या बिचुकलेंचे शिक्षक मतदारसंघातील आव्हान संपुष्टात आले आहे.अभिजीत बिचुकले यांनी प्रचारादरम्यान शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली होती. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कोणाशीही संघर्ष करण्याची तयारी असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच, शिक्षक मतदारांना उद्देशून बोलताना त्यांनी, “तुम्हाला रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागणार नाही. तुमचे लीडर लेचेपेचे आहेत. लीडर हा डॉ. अभिजीत बिचुकलेसारखा हवा,” असे वक्तव्य केले होते. मात्र, मतमोजणीत त्यांना मिळालेल्या अत्यल्प मतांमुळे त्यांच्या दाव्यांना मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र समोर आले आहे. विविध निवडणुका लढवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा बिचुकले यांनी यापूर्वीही दाखवली आहे. मात्र, यंदाच्या शिक्षक मतदारसंघातील निकालाने त्यांना मोठा धक्का दिला आहे.




