१ ते ९ नोव्हेंबर पीएलआय व आरपीएलआय सेवांचे व्यवहार बंद ; डाक विभागाची महत्त्वाची सूचना


*रत्नागिरी, दि. २८ : डाक जीवन विमा (PLI) व ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सेवांसाठी सध्या वापरात असलेल्या ‘मॅककॅमिश’ (McCamish) प्रणालीचे नवीन ‘इन्शुरन्स मॅनेजमेंट सोल्युशन’ (IMS) या अत्याधुनिक सॉफ्टवेअरमध्ये स्थलांतर (मायग्रेशन) करण्यात येणार आहे. या तांत्रिक स्थलांतर प्रक्रियेमुळे येत्या १ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत पीएलआय आणि आरपीएलआय सेवांसाठी ‘नो ट्रान्झॅक्शन डे’ (No Transaction Day) घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमधील (पोस्ट ऑफिस) काउंटरवर डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा या योजनांशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाणार नाहीत. तसेच, या सेवांशी निगडित ऑनलाइन सुविधाही पूर्णपणे बंद राहतील.
टपाल विभागाच्या ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन आपले आवश्यक पीएलआय व आरपीएलआय संदर्भातील सर्व व्यवहार १ नोव्हेंबर पूर्वी किंवा ९ नोव्हेंबर नंतर पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button