लोगो.. मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा

पुरुषांच्या तायक्वांदो स्पर्धेत गुरुनानक खालसा महाविद्यालयास विजेतेपद. वर्तक महाविद्यालयास उपविजेतेपद

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषांच्या तायक्वांदो स्पर्धेच्या माटुंगा, मुंबई येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर वाशी- पालघर येथील विद्यावर्धिनी आण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाने उपविजेतेपदावर नाव कोरले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धा दोन दिवस सुरू होत्या.

स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तायक्वांदो निवड समिती सदस्य डॉ. विश्वंभर जाधव, तायक्वांदो आंतरराष्ट्रीय रेफ्री व राष्ट्रीय फेडरेशनचे संचालक सुभाष पाटील, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आदी उपस्थित होते.

सविस्तर निकाल असा-
५४ किलो खालील गट- सुवर्णपदक- अविनाश राऊळ (जोशी- बेडेकर महाविद्यालय, ठाणे), रजत- वेदांत धाडके (वर्तक, मल्होत्रा अँड्रुज महाविद्यालय, वसई). कांस्य- आकाश डापसे (शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा) व श्रीधर मलिक (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा). ५८ किलो खालील गट – सुवर्ण- देवेश बाह्मणे (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत- नमन दवे (वर्तक, मल्होत्रा,अॅंड्रुज महाविद्यालय, वसई), कांस्य- अथर्व मांडे (सेंट जॉन कॉलेज, पालघर), कांस्य- स्वानंद कुलकर्णी (द एस.आय.ए. महाविद्यालय डोंबिवली).
६३ किलो खालील गट- सुवर्णपदक- श्रीजय भगत (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत- शार्दुल शेडगे (के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट, सायन), कांस्य जय वारुंग (सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट, बोरीवली), कांस्य- अमर्त्य पोल (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा). ६८ किलो खालील गट सुवर्ण- शाहिद शेख (गुरु नानक महाविद्यालय, माटुंगा), रजत- ओम कदम (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), कांस्य देवेन सुपल (गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी), कांस्य अजय चौहान (अग्रवाल महाविद्यालय, कल्याण).
७४ किलो खालील गट- सुवर्ण- आर्यन येवले (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजतपदक- प्रेम पाटणे (विद्याधिराज महाविद्यालय, न्यू पनवेल), कांस्य- विराज गवस (सेंट झेव्हियर्स कॉलेज महापालिका मार्ग), कांस्य शिवम ताम्हणकर (झुंझुनवाला कॉलेज, घाटकोपर). ८० किलो खालील गट- सुवर्ण निहाल भोईर (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत विराज साऊळ (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), कांस्य आदित्य पाठक (ठाकूर कॉलेज कांदिवली), कांस्य- उत्कर्ष मिश्रा (पिल्लाई महाविद्यालय खालापूर). ८७ किलो खालील गट- सुवर्ण प्रसाद पाटील (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत- रुद्र जंगम (आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूण) कांस्य- सूरज गमरे (बेहरे, शेठ महाविद्यालय, खेड), कांस्य- वेदांत दरेकर (पिल्लाई महाविद्यालय, न्यू पनवेल). ८७ किलो वरील गट- सुवर्ण श्रीनिधी काटकर (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत- शिवंश यादव (शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा), कांस्य दिब्यांशू चौहान (सोमय्या कॉलेज विद्याविहार), कांस्य सुनय मुखर्जी (बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button