महाराष्ट्र एन. सी. सी. डिरेक्टरेट ची नौका भ्रमण मोहीम कोकणच्या जयगड खाडीतून बोऱ्या बंदरात प्रवेश करत साहसी उपक्रम राबविण्यात आले.

महाराष्ट्र एन. सी. सी. डिरेक्टरेट च्या कोंकण ज्ञानतरंग मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी एन सी सी cadets नी रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर 350 फूट कड्यावरून रॅपलिंग करतं समुद्राच्या पाण्यात उतरले. तसेच गणपतीपुळे बीच ला पॅरासेलिंग करत थरारक प्रसंग अनुभवले. तसेच मोहिमेच्या चौथ्या दिवशी सकाळी 7 वाजता जयगड बंदरातून शुभारंभ करून तवसाळ जेट्टीला भेट देत बोऱ्या बंदरात दाखल झाल्या.

या कॅम्पदरम्यान अभियानातील पथनाट्य पथकाने स्थानिक नागरिकांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी तावसळ गाव मध्ये जिल्हा परिषद शाळे मध्ये पथनाट्य करत स्थानिक लोकांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापति निलेश सुर्वे उपस्थित होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच व इतर शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते.जवळ पास 90.ते 100 स्थानिक जनतेचा सहभाग या कार्यक्रमाला झाला.


तसेच कोकणातल्या बीच वर स्पोर्ट्स अँक्टिव्हिटी खो खो, रस्सीखेच vollyball, badminton, खेळत दिवसाची समाप्ती केली.

विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या सर्व पथनाट्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button