
देवरुख शहरात नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा
देवरुख शहरातील नागरिकांना गेले तीन दिवस नळपाणी याेजनेच्या माध्यमातून गढूळ पाण्याचा पुरवठा हाेत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगर पंचायत प्रशासनाने त्वरीत लक्ष द्यावे, नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे.
शहराला पर्शरामवाडी व धावडेवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. कावलटेक येथे जलशुध्दीकरण प्रकल्प असून तेथून. पाणी शहरात उभारलेल्या टाक्यांमध्ये आणले जाते. साेमवार वगळता सकाळी नळपाणी याेजनेच्या माध्यमातून पाणी नागरिकांपर्यंत पाेहाेचविले जाते. दाेन हजाराहून अधिक ग्राहक आहेत. या ग्राहकांना गेली तीन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा हाेत आहे. हे पाणी पिण्यास अयाेग्य आहे. यामुळे नागरिकांची पाण्याविना गैरसाेय झाली आहे. आत्ता ही अवस्था असेल तर पावसाळ्यात काय, असादेखील सवाल उपस्थित हाेत आहे.
न. पं. प्रशासनाने गढूळ पाणी का येत आहे याबाबत किमान नागरिकांना माहिती देणे गरजेचे हाेते. मात्र प्रशासनाने वेळ मारून नेत डाेळेझाक केल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यावर तात्काळ उपाययाेजना करून स्वच्छ पाणी मिळावे, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे.




